आंतरिक शोध

वाचकांना विनंती !
१. ‘संस्कृत’ ही देवभाषा असून चैतन्यदायी आहे. तिच्यातील चैतन्याचा लाभ वाचकांना व्हावा, यासाठी संकेतस्थळावर संस्कृत श्लोक / वचने देण्यात येतात. यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास वाचकांनी त्या आम्हाला अवश्य कळवाव्यात.

२. संकेतस्थळावर संस्कृत वचने / श्लोक संदर्भासहित दिले आहेत. काही संस्कृत वचनांचे / श्लोकांचे संदर्भ मिळू शकले नाहीत, त्यांच्यापुढे कंसात ‘संदर्भ : अज्ञात’ असे लिहिले आहे. त्यांचा संदर्भ ज्ञात असल्यास कृपया वाचकांनी तो कळवावा.

संगणकीय पत्ता : info@balsanskar.com




चतुःश्लोकी भागवत - हरिकृपा

मूल्यांकन : Not Rated | वाचक संख्या : 657
By Bal Sanskar

हरिकृपेशिवाय अनुताप नाहीं

जंव हरी हदयीं कृपा न करी । तंव अनुताप नुपजे शरीरीं ।
त्याची पूर्ण कृपा ज्यावरी । तो विषयीकांकुरीं वीतरागी ॥७२॥

विवेकाविण वैराग्य उठी । तें अपायीं घाली कडेकपाटीं ।
कीं वैराग्यविण विवेक उठी । तो जन्मला पोटी नपुंसक ॥७३॥

विवेकाविण वैराग्य आंधळे । वैराग्याविण विवेक पांगुळें ।
हें एकएका अवेगळें । झाल्याविण नकळे परमार्थ ॥७४॥

जे कृष्णकृपा पूर्ण घडे । तै विवेकवैराग्य समपाडें ।
हदयी वाढती वाडेंकोडें । तै ब्रह्म आतुडे तत्काळ पूर्ण ॥७५॥

वैराग्यविण जे स्थिती । त्यांतें गिळी विषयशक्ती ।
विवेकहीन वैराग्यस्थिती । ते जंतू पडती अंधत्वें ॥७६॥

जें कृष्णकृपा पूर्ण आकळें । तें विवेक वैराग्य एके वेळे ।
जें हदयी वाढे प्रांजळें । तें परब्रह्म लोळे दोंदावरी ॥७७॥

तेणें श्रीनारायणें आपण । ब्रह्मयावरी कृपा केली पूर्ण ।
कमळासनीं बैसोनि जाण । झाला विवेकसंपन्न वीतरागी ॥७८॥





प्रतिक्रिया

प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)




*Image Validation (?)


*प्रतिक्रिया





लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त
Itihas
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group   


Follow us on
© २०१३ बालसंस्कार.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत.