Select Language : हिंदी , English , ಕನ್ನಡ  

आंतरिक शोध

Subscribe To Newsletter

Enter your email address:


Delivered by FeedBurner
Kindly note verification mail goes to SPAM, so please check your SPAM folder

आरती,संग्रह,Arati,Mi,Marathi,Manus,hindi,आरती संग्रह,गणेश महिमा, गणेश पूजन, मोदक, अष्टविनायक, अष्टगणेश, गावचा गणपती, सिध्दिविनायक, श्रीगणेशा, श्री गणेशाय नम, लंबोदर, श्रीगणेशाचे, श्रीगणेश,,Ganesh, Ganapati, Shri Ganesh, Ganesh Festival, Ganesh Mahima, Ganesh Pujan,--><!--@@CommonKeywords@@--><!--श्रीरामरक्षास्तोत्र
आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)

सूट १० %

खरेदीसाठी भेट द्या !


श्री गोरक्षनाथ (इ.स. १००० ते ११००)

मूल्यांकन : Average Rating : 5.03 From 30 Voter(s) | वाचक संख्या : 4451

        मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत रंजलेल्या-गांजलेल्यांना, अनेक दुःखी-कष्टी पीडितांना सुखाचा मार्ग दाखवू लागले, त्यांची दुःखे दूर करू लागले. त्यांच्या नावाचा जयजयकार होऊ लागला. ते चंद्रगिरी गावास गेले. त्या गावात सर्वोपदयाळ या नावाचा एक वसिष्ठगोत्री गौड ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सरस्वती होते. ती अतिशय सद्गुणी होती. पुत्रसंतान नसल्यामुळे ती दुःखी होती.  त्यांच्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षा मागण्यास गेले. सरस्वतीने त्यांना भिक्षा घातली, नमस्कार केला. 'आपणाला संतती नाही, उपाय सांगा,' अशी तिने विनंती केली. 
 
         मच्छिंद्रनाथांनी तिला सूर्यमंत्राने मंत्रून भस्म दिले व सांगितले, ''हे भस्म रात्री निजतेवेळी सेवन कर. हे भस्म ही नुसती राख नाही, नित्य उदयास येणारा हा साक्षात हरिनारायण आहे. तो तुझ्या उदरी येईल. तुझ्या त्या पुत्रास मी स्वतः येऊन उपदेश करीन. तो जगात कीर्तिमान होईल. सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील.'' मच्छिंद्रनाथ जाण्यास निघाले तेव्हा तिने विचारले, '' महाराज, तुम्ही पुन्हा कधी याल?'' यावर नाथ म्हणाले, ''बारा वर्षांनी मी परत येईन !'' असे सांगून ते निघून गेले.
 
         
सरस्वतीने ते भस्म पदरात बांधून ठेवले. ती नंतर शेजाऱ्याच्या घरी गेली. तिथे अनेक बायका जमल्या होत्या. सरस्वतीने त्यांना सांगितले, ''एक बाबा आला होता. त्याने मला पुत्र होण्यासाठी भस्म दिले आहे.'' यावर त्या सर्वजणी हसल्या व म्हणाल्या, ''असल्या भस्माने का मुले होतात?'' त्या सर्व बायकांनी तिच्या मनात किंतु भरवल्यामुळे तिने आपल्या घराजवळील गोठ्याजवळ शेण टाकण्याच्या खाचीत ते भस्म टाकून दिले.
 
        बारा वर्षानंतर मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात सरस्वतीच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. त्यांना पाहून सरस्वती बाहेर आली. तिने नाथांना ओळखले. ''मुलगा कुठ आहे?'' नाथांनी विचारले. ''मला मुलगा झालाच नाही.'' तिने सांगितले. ''खोट बोलू नकोस ! त्या भस्माचे काय झाले?'' नाथांनी प्रश्न केला. ''मी ते शेण टाकण्याच्या जागी नेऊन टाकले. योगीराज, मला क्षमा करा !''. मला ती जागा दाखव. तिने नाथांना ती जागा नेऊन दाखविली.
 
        ''हे प्रतापवंता, हरिनारायणा, सूर्यसूता तू जर गोवऱ्यात असलास तर बाहेर ये!''. ''गुरुराया, मी इथ आहे. गोवऱ्यांची रास मोठी आहे. तुम्ही मला बाहेर काढा.''मच्छिंद्रनाथांनी लगेच खाच उकरून त्या मुलास बाहेर काढले. तो तेजःपुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला. सरस्वतीला पश्चाताप झाला. मच्छिंद्रनाथ त्या मुलास आपल्याबरोबर घेऊन गेले. गोरक्षनाथ असे त्याचे नाव ठेवले. त्याला शाबरी विद्येत प्रवीण केले. अस्त्रविद्येतही निपुण केले. योगबळामुळे गोरक्षनाथांनी चिरंजीवित्व प्राप्त करून घेतले होते. सिद्ध सिद्धांतपद्धती, अमनस्कयोग, विवेकमार्तंड, गोरक्षबोध, गोरक्ष शतक इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रसिध्द आहेत.
 
         शके सतराशे दहापर्यंत सर्व नवनाथ प्रगटरूपाने फिरत होते. नंतर ते गुप्त झाले. गिरनारपर्वतातील श्रीदत्तात्रेयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिले. चौऱ्याऐंशी सिद्धांपासून नाथपंथ भरभराटीस आला. नेपाळी लोक गोरक्षनाथांना पशुपतीनाथाचा अवतार मानतात. नेपाळमध्ये काही ठिकाणी त्यांचे आश्रम आहेत. नाण्याच्या एका बाजूवर त्यांचे नावही आढळते. महाराष्ट्रातील औंढ्या नागनाथ ही त्यांची तपोभूमी असल्याचे म्हटले जाते.


प्रतिक्रिया

अमित सुनील सुपेकर
June 30, 2013, 3:46 pm

माझ्या मते नवनाथ संप्रदयाचे प्रसारण मोठ्या प्रमाणावर व्हावे, आणि सर्वांनी रंगपंचमीला नाथांच्या दर्शनाला सर्वांनी जावे आणि तेथील अनुभव घ्यावा.
दगू gangurde
August 11, 2011, 2:53 am

गोरक्ष किमयागार books
चैतन्य
June 12, 2011, 12:56 am

जय गोरक्षनाथ !
देवा, तुझ्या कृपेने आमच्यात अशी भक्ती निर्माण होऊ दे. मत सरस्वती द्वारे विकल्पाने जशी चूक झाली, तशा चुकांपासून आम्हा दिनांचे सदैव रक्षण होऊ दे.
प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)


* शहर*Image Validation (?)


*प्रतिक्रिया

लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त
-->
Vadhdivas
Participate
Android app on Google Play
  Bal Sanskar© २०१५  बालसंस्कार.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत.  
Terms of use l Privacy policy l Spiritual Terminology