Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध

मुलांना शिस्त कशी लावावी ?


मूल्यांकन : Average Rating : 6.15 From 143 Voter(s) | वाचक संख्या : 16460
By Bal Sanskar

 मुलांना शिस्त लावणे (कशी लावावी ?)

        शिस्त आणि शिक्षा हे दोन्ही शब्द शिक्षण या शब्दापासून निर्माण झाले आहेत. शिक्षणाद्वारे चांगली वागणूक अमलात आणणे म्हणजेच शिस्त होय. यासाठी शिक्षा कशाबद्दल व कोणत्या चुकीबद्दल व गैरवर्तणुकीबद्दल आहे, हे समजून देऊनच शिक्षा करावी.
 

शिस्त लावण्याबद्दल महत्त्वाच्या सूचना 

१. चांगल्या वर्तणुकीचे कौतुक व गैरवर्तणुकीबद्दल शिक्षा : मुलांना परीक्षेत चांगले गुण मिळाले किंवा बक्षीस मिळाल्यास त्याची स्तुती करावी. त्यांना शाबासकी द्यावी म्हणजे त्याला आणखी चांगले वागण्यास प्रोत्साहन मिळेल. त्याच्या गैरवर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त करावी व जरूर तर शिक्षाही करावी.

२. आज्ञा न करता विनंती करावी : 'पाणी आण', असे न सांगता 'राजा मला एक ग्लास पाणी आणून देशील का ?', अशी विनंती करावी.

३. घरातील मंडळींची एकवाक्यता : मुलाला शिस्त लावण्यापूर्वी मुलाकडून नेमक्या कशा वागणुकीची अपेक्षा आहे, याचा विचार करून आपली भूमिका निश्चित करावी व दुमत होऊ देऊ नये. आई-वडिलांची व घरातील इतर मंडळींची एकवाक्यता मुलाला शिस्त लावण्याच्या कामी अत्यंत आवश्यक असते. खिडकीचे गज दरून खिडकीवर उंच चढत जाण्याबद्दल वडिलांनी शाबासकी व त्याच कृत्याबद्दल आईचे रागावणे, असे होता कामा नये. शिक्षा केव्हा करावी यासंदर्भातील मतभेद आईवडिलांनी अगोदरच सोडवून ठेवावेत. मुलासमोर सोडवू नये.

४. चूक झाल्यास लगेच शिक्षा करावी : 'थांब संध्याकाळी बाबांना येऊ दे, मग बघते' ही चुकीची शिक्षा आहे. त्यामुळे बाबा येईपर्यंत मुलगा शिक्षेच्या काळजीत रहातो. मुलाने केलेल्या चुकीच्या तुलनेशी मिळते-जुळते असावे. आमच्या शाळेचे प्राचार्य व गुरुवर्य हे अतिशय सात्त्विक व शांत गृहस्थ. त्यांच्याकडे कोणताही विद्यार्थी भीतीने न जाता आदराने व प्रेमाने जायचा. एके दिवशी मी त्यांना भेटावयास गेलो असता एका १० वीतल्या मुलाला ते छडीने बेदम मारीत होते. काळे गुरुजींचा रौद्रावतार बघून मीच थक्क होऊन गेलो. नंतर त्यांना भेटल्यावर ते म्हणाले, `काल हा विद्यार्थी आईच्या मर्तिकासाठी माझ्याकडून ५० रुपये घेऊन गेला. मी ते आनंदाने दिले. आज सकाळी मला देवळात त्याची आई भेटली. या मुलाला जन्मभर लक्षात राहील अशीच शिक्षा योग्य. नाहीतर तो अट्टल फसवणारा झाला असता.
 

योग्य व अयोग्य शिक्षा

        मुलाशी न बोलणे किंवा मुलाला दिवसभर उपाशी ठेवणे या शिक्षा योग्य नव्हेत. कारण संध्याकाळी तीच आई जेवण्यासाठी मुलाची मनधरणी करील. संध्याकाळी मुलाला खेळायला घराबाहेर न पाठवणे किंवा त्याला दूरचित्रवाणी बघू न देणे ही योग्य शिक्षा होय.
 

बालमनावर शिस्तीचा संस्कार करा !

        `साधनेचा मूळ पाया म्हणजे शिस्त. प्रत्येक कृतीला जर शिस्त, नियम घालून घेतले नाहीत, तर ती कृती अपूर्ण होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिस्तीचे काटेकोर पालन केले, तर अध्यात्मातील प्रगती जलद होते. त्यासाठी लहानपणीच शिस्तीचे संस्कार बालमनावर रुजवायला हवेत.'
 

शारीरिक स्तरावर

अ. मुलांना स्वावलंबी बनवणे : 'लहानपणीच मुलांना योग्य वळण लावावे. झोपून उठल्यावर स्वत:च्या पांघरुणाची घडी घालायला शिकवावे. सुरुवातीला नीट येणार नाही; पण हळूहळू मूल जसे मोठे होईल, तसा व्यवस्थितपणा त्याच्या अंगी आल्याशिवाय रहाणार नाही. सकाळचे आन्हीक उरकल्यावर शाळेचा अभ्यास, शाळेची तयारी त्यांची त्यांनाच करायला शिकवावी. अभ्यासाची पुस्तके, वह्या नीटनेटक्या व जागच्याजागी ठेवायचे वळण लावावे. शाळेतून अथवा बाहेरून आल्यावर चप्पल-बूट, दफ्तर वगैरे ठराविक जागीच ठेवायला शिकवावे. तसेच हातपाय स्वच्छ धुतल्यावर कपडे बदलून त्यांच्या नीट घड्या घालून ठेवण्यास शिकवावे. कपड्याचे बटण अथवा हुक तुटले असल्यास किंवा कपडे थोडेसे उसवले असल्यास त्यांचे त्यांनाच शिवायला शिकवावे. स्वत:चे स्वत: करण्यात मुलांनाही आनंद वाटतो. वयानुसार स्वत:चे कपडे धुवायलापण शिकवावे. सकाळ-दुपारचा नाश्ता झाल्यावर कपबशी व ताटली घासायला शिकवावी. थोडक्यात म्हणजे मुलांना स्वावलंबी करावे. त्यात मुलगा-मुलगी असा फरक नको. प्रत्येक गोष्टीचे नीट वळण लावले, तर मूल घरी असो वा इतर ठिकाणी, ते नेटकेपणानेच वागेल.'

आ. लवकर निजणे व लवकर उठणे : 'लहानपणापासूनच मुलांना लवकर उठण्याची सवय लावावी. पुष्कळ घरांतून बघायला मिळते की, मुले अभ्यासासाठी रात्री जागतात व सकाळी ८-९ वाजता उठतात. याउलट रात्री लवकर झोपून पहाटे अभ्यास केला असता तो जास्त चांगला लक्षात रहातो. `लवकर निजे व लवकर उठे, त्यास आरोग्य व धन-संपत्ती मिळे ।', असा श्लोक आहे. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ब्राह्ममुहूर्तावर उठून वेदपठण करत असत. रात्री रज-तमाचे प्राबल्य असते. याउलट पहाटे सात्त्विकता असल्यामुळे त्याचा अभ्यासावर चांगला परिणाम होतो.'

मानसिक स्तरावर

अ. प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्यास शिकवणे : मोठ्यांच्या कृतींतूनच लहान मुले शिकतात; म्हणून मोठ्यांनीच आपले वागणे, बोलणे, इतरांना मान देणे, हे सर्व केले पाहिजे. तसेच प्रत्येक गोष्ट वेळेवर करावी. 'मग करू' म्हटले की, पुन्हा ती गोष्ट केली जात नाही. त्यासाठी शरिराला म्हणण्यापेक्षा मनालाच शिस्त लावायला पाहिजे.

आ. स्वच्छता व नीटनेटकेपणाचा संस्कार मनावर करणे : पुष्कळांच्या घरी कपाटात, रॅकमध्ये कपडे कोंबलेले किंवा अस्ताव्यस्त लटकलेले असतात. तसेच घरही अव्यवस्थित असते. मग घरात कोणी अचानक आले, तर धांदल उडते. एकदा हाताला वळण लावले की, मनाला ते नीट केल्याशिवाय स्वस्थता लाभत नाही. घर स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यामध्ये आळस नको. आळस हा आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे, हे मुलांच्या मनावर बिंबवावे.

इ. मुलांचे अती लाड करणे टाळणे : आजकाल घरांतून एखाद-दुसरेच मूल असल्याने त्यांची आवड-नावड जपली जाते. जेवण, कपडे सर्वच बाबतींत 'मुले म्हणतील ती पूर्व दिशा', असे आढळून येते. लहानपणापासून त्यांचे ऐकत गेले की, मुले पुढे ऐकेनाशी होतात. त्यामुळे त्यांचे अती लाड करू नयेत.'


आध्यात्मिक स्तरावर

अ. मुलांवर सुसंस्कार होण्यासाठी साधनेचे पाठबळ देणे : मुले सदवर्तनी होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे पालकांनी स्वत: सद्वर्तनी असायला हवे आणि दुसरे म्हणजे त्यांना शिस्त लावण्याच्या जोडीला त्यांना भक्ती करण्यास शिकवायला हवी. साधनेचे किंवा उपासनेचे पाठबळ असेल, तर मुलांमध्ये सद्गुण चटकन अंगी बाणतात. हट्टी किंवा न ऐकणाऱ्या मुलांना बदलण्याची शक्ती ही भगवंताच्या नामात आहे आणि याचा अनुभव कित्येकांनी घेतला आहे.

आ. भक्तीचे बीज स्वत:च्या हृदयकमलात पेरल्याने ते बीज मुलात निर्माण होणार असणे : ही सर्व स्थिती बदलण्यासाठी आपल्याला जीवनात अध्यात्माची, भक्तीची गरज आहे. प्रथम पालकांनी भक्तीचे बीज स्वत:च्या हृदयकमलात पेरायला हवे. मगच ते बीज त्यांच्या मुलात निर्माण होईल. 'वाल्याचा वाल्मिकी झाला', अशा गोष्टी आपण सांगतो; पण स्वत: मात्र साधना करत नाही. 'भगवंताच्या नामातच मुलांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची क्षमता असल्याची जाणीव सर्व पालकांना होवो व सर्व पालकांच्या माध्यमातून सुसंस्कारित सद्गुणी पिढी राष्ट्र्राला मिळून ईश्वरी राज्य लवकर येवो', अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

इ. वेळोवेळी प्रार्थना व कृतज्ञता व्यक्त करायला शिकवणे : सकाळी झोपून उठल्याबरोबर मुलांना अंथरुणातच प्रार्थना करायला व आजचा दिवस ईश्वराने दाखवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकवावे. तोंड धुतल्यावर देवाला नमस्कार करायला सांगावे. कोणतीही गोष्ट खाण्यापूर्वी त्यांच्याकडून प्रार्थना म्हणवून घ्यावी. तसेच 'प्रत्येक गोष्ट ईश्वरकृपेनेच झाली', हे त्यांच्या मनावर बिंबवावे.

ई. मुलांपुढे स्वत:चा आदर्श ठेवण्याचे लाभ : घराचे 'सत्यं शिवं सुंदरम्' करायचे असेल, तर शिस्त, आज्ञापालन, मोठ्यांचा आदर करणे, हे सर्व करता आले पाहिजे. मोठ्यांनी आपला आदर्शच असा निर्माण केला पाहिजे की, आपले वळण, शिस्त बघून आपले मूलही आपले अनुकरण करील. असे झाले, तर आदर्श कुटुंब व्हायला वेळ लागणार नाही.




संबंधित लेख

» मुलांची भीती कशी घालवावी ?
» पालकांनो, मुलांना शिस्त लावण्यासाठी
प्रतिदिन हे करा !

» पालकांनो, मुलांना यशस्वी होण्यासाठी साहाय्य करा!
» मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास कसा करावा ?
» पालकांनी पाल्याशी कसे वागावे ?


प्रतिक्रिया

वैशाली ओशी
March 2, 2013, 4:09 am

good
varsha dange
January 7, 2013, 9:09 pm

खूप छान लेख आहे. अगदी मनासारखा म्हणजे समाधान कारक लेख आहे.
धन्यवाद ! आभारी आहे.
विष्णू गारमोडे
July 17, 2012, 9:54 pm

खूपच छान
ज्योती हरेश पांचाल
February 23, 2012, 8:56 pm

खूप छान आहे लेख .माझी मुलगी ८वि ला आहे आभ्यास करायला सांगितलेकी सांगते कंटाळा आला
नंतर करेन पण करत नाही तिला ओरडले कि हातपाय आपटून आरडा ओरडा करून बसते.काय करू साम्जात्नाही उपाय सांगा दुसरा मुलगा आहे तो २रि ला आहे तो आभ्यास करतो त्याचे तरी तिने शिकावे.
मयुरी
February 20, 2012, 3:25 pm

खूप छान आणि उपयुक्त लेख आहे मनापासून abhar
मिलिंद सावंत
November 2, 2011, 3:36 pm

खूप छान मी पण हेच करतो आणि अजून करायचा प्रयतन करीन धन्यवाद.
संजीव रासपायाले
October 20, 2011, 3:26 pm

फक्त हा लेखच नाही तर पूर्ण संकेतस्थळ फारच उपयुक्त आणि सद्य परिस्थितीत अत्यावश्यक आहे. मुलांना चांगले संस्कार द्यायची इच्छा असूनही असे मार्गदर्शन इतरत्र उपलब्ध नाही. कितीही धन्यवाद दिलेत तरीही कमीच पडतील.
चांगला लेख अkvdala
September 8, 2011, 4:08 pm

लेख avadala
श्रीकृष्ण Jalamkar
August 29, 2011, 7:52 pm

खूपच छान.
सोमनाथ देशकर
August 28, 2011, 11:01 pm

खूप छान लेख लिहिला आहे, स्वछताचे महत्व,आरोग्य, चांगले राहणे, शिस्त, अध्यात्माची, भक्तीची गरज आहे.
खरी काळाची गरज आपण मांडली आहे, त्या बद्दल तुमचे अभिनंदन अगदी मना पासून अभिनंदन.
लेख मुलांना व पालकांना उपयुक्त. चांगला उपक्रम. धन्यवाद.
"नाही निर्मल जीवन काय करील साबण"- संत तुकाराम महाराज
ममता सत्विलकर
August 22, 2011, 9:10 pm

वेरी गुड खूप छान मला पण मुलगी आहे ती १० वी ला आहे पण ती माझे काही अकेत
नाही काही तरी सुचवा
विलास LIKHAR
July 24, 2011, 1:02 pm

खूप छान खूप चं छान लेख आहे.
HIRAMAN MADHUKAR JADHAV
July 21, 2011, 4:16 pm

वेरी वेरी गुड
शशिकांत नाळे
July 17, 2011, 10:55 pm

खरच खूप छान वेब साईट तयार केली आहे... सर्व प्रकारची माहिती येथे उपलब्ध आहे. आम्ही सुद्धा मुलांबद्दलच्या बऱ्याच गोष्टीमध्ये द्विधा मनस्थितीत होतो, पण येथे आमच्या शंका दूर झाल्या... धन्यवाद!!!
प्रदीप जाधव
June 22, 2011, 5:01 pm

हा लेख लहानांसाठी तर आहेच पण ज्या पालकांकडे असले गुण नाही त्याच्यासाठी उपयोगी आहे फारच छान लेख आहे.
प्रदीप jadhav
June 22, 2011, 4:57 pm

खूप छान लेख लिहिला आहे माझ्या घराच्या लोकांना नेहमी सांगतो कि स्वछताचे गुण नेहमी अंगी लावा त्याने आरोग्य चांगले राहते हे गुण जर आपल्याकडे असले तर आपल्या मुलाकडे असणारच तर हा लेख लहानांसाठी तर आहेच पण स्वच्छता, शिस्त, आरोग्य, हे गुण ज्या पालकांकडे नाही अश्या पालकांसाठी हा लेख उपयोगी ठरेल
स्मिता राजेश सुर्वे
May 19, 2011, 4:25 pm

माझा मुलगा २ वर्षाचा आहे. त्याचे आजी-आजोबा खूप म्हणजे खूपच लाड करतात. तो चुकला तर त्याला मी फटके देते, तर ते मलाच ओरडतात, माझ्यावरच हात उचलतात, आणि म्हणतात, तुला स्वता:च मुलगा जड झालाय. तुला कोणी खपत नाही. मी दिवसभर कामावर माझे मिस्तरहि दिवसभर बाहेर तर कधी ओउत ऑफ स्टेशन. तो सगळ्यांना उलट बोलतो आणि हाताने आणि पायाने मारतो. मग मी आता काय करू? कशी त्याला मी मोठ आणि निर्व्यसनी आणि व्यवस्थित बनवू ? मला खूप विचार पडलाय माझ्या मुलाचाच मला आताशी एकच मुलगा आहे. मी काय करू ह्यावरून आमच्यात खूपच वाद होतात.
कीर्ती पु .मोरे
April 30, 2011, 4:19 pm

खूप चांगले लिहिले आहे ,आजपासून मी स्वत: बदलून तुम्ही सागीत्यालाप्रमाणे वागेन जेणे करून मोठे जाहल्यावर तेच संस्कार माझ्या कुंटूबियांवर होतील.येत्या २ जूनला माझ्या होणाऱ्या जीवनसाथी म्हणजेच माझा भावीपती यांचा वाढदिवस देखील तुम्ही सांगितल्या प्रमाणे साजरा करीन.
कीर्ती पु .मोरे
April 30, 2011, 4:18 pm

खूप चांगले लिहिले आहे ,आजपासून मी स्वत: बदलून तुम्ही सागीत्यालाप्रमाणे वागेन जेणे करून मोठे जाहल्यावर तेच संस्कार माझ्या कुंटूबियांवर होतील.येत्या २ जूनला माझ्या होणाऱ्या जीवनसाथी म्हणजेच माझा भावीपती यांचा वाढदिवस देखील तुम्ही सांगितल्या प्रमाणे साजरा करीन.
राज aher
April 4, 2011, 3:21 pm

गुड वेरी वेरी गुड
सतीश रेगे
January 18, 2011, 2:28 pm

चांगले लेख व गोष्टी. मुलांना व पालकांना उपयुक्त. चांगला उपक्रम. धन्यवाद
विनोद गादीकर
January 14, 2011, 3:03 am

खूप छान.पालकांना सोप होईल .ह्याचा पालकांनी लाभ घ्यावा .
sumrudhi
December 15, 2010, 1:20 pm

खुपः chan
प्रणाली
October 13, 2010, 3:17 pm

खूप चांगले लिहिले आहे मी पण माझ्या मुअलाला अशीच वागणूक लावेन
आणि उद्या त्याचा वाढदिवस आहे तो तीन वर्षाचा होईल आणि मी त्याला खूप चांगल्या प्रकारे त्याचा उद्याचा दिवस घालवेन त्याचे नाव आहे विघ्नेश तर तुम्ही पण त्याला खूप खूप आशीर्वाद द्या बरे का तुमचे खूप खूप अभिनंदन
शिंदे deepak
October 8, 2010, 7:33 pm

खूप चं छान लेख आहे. मी प्रयत्न करील माझ्या मुलीला असे संस्कार देण्यासाठी ती ३ वर्षाची आहे. ती खुप हट्टी आहे. ती प्रतेयक गोष्टी साठी रडते.मी काय करू कृपया सुचवा
शिवांगी कुलकर्णी
September 20, 2010, 12:32 am

मी १ तेरा वर्षाची मुलगी आहे मी या शिस्त अंगी बाळगीन .
शिवांगी
September 20, 2010, 12:25 am

खूपच छान
मुकता हाके
September 19, 2010, 8:14 pm

खूपच छान. पण माझा मुलगा उलट हाथ पटकन उचलतो, मारू हा शब्द उच्चारतो लहान मोठे बघत नाही, पाळणा घरात तो ऐकतो पण बाहेर तो वरीलप्रमाणे वागतो, तर मी काय करू, सुचवा.
anuradha
August 19, 2010, 4:54 pm

खूप चं छान लेख आहे. मी प्रयत्न करील माझ्या मुलीला असे संस्कार देण्यासाठी ती ३ वर्षाची आहे. ती खुप हट्टी आहे. ती प्रतेयक गोष्टी साठी रडते.मी काय करू कृपया सुचवा

राजेंद्र कडू
August 18, 2010, 4:53 pm

उत्तम लेख.
swati
July 10, 2010, 9:37 pm

खूपच chan

प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)


* गाव नगरी




*Image Validation (?)


*प्रतिक्रिया





लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group