Select Language : हिंदी , English ,  ಕನ್ನಡ  

आंतरिक शोध

Subscribe To Newsletter

Enter your email address:


Delivered by FeedBurner
Kindly note verification mail goes to SPAM, so please check your SPAM folder

आरती,संग्रह,Arati,Mi,Marathi,Manus,hindi,आरती संग्रह,गणेश महिमा, गणेश पूजन, मोदक, अष्टविनायक, अष्टगणेश, गावचा गणपती, सिध्दिविनायक, श्रीगणेशा, श्री गणेशाय नम, लंबोदर, श्रीगणेशाचे, श्रीगणेश,,Ganesh, Ganapati, Shri Ganesh, Ganesh Festival, Ganesh Mahima, Ganesh Pujan,--><!--@@CommonKeywords@@--><!--


श्रीरामरक्षास्तोत्र
आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)

सूट १० %

खरेदीसाठी भेट द्या !


गर्भसंस्कार : मुलांवर संस्कार केव्हापासून करावे ?


मूल्यांकन : Average Rating : 4.12 From 363 Voter(s) | वाचक संख्या : 70128
By Bal Sanskar


 

मूल जन्माला येण्यापूर्वी

गर्भावर चांगले संस्कार कसे करावेत ? : आई-वडील व घरातील मंडळींच्या सात्त्विक विचारांचाही गर्भाच्या मनावर परिणाम होतो. या सात्त्विक वातावरणाचे मुलाच्या पुढील शारीरिक व मानसिक वाढीवर चांगले परिणाम होतात. संत वाग्मय, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, दासबोध, भगवद्गीता यांपैकी वाचन करावे. संतांची, देवांची, चरित्रे वाचावीत. मनक्षोभ होईल असे वाड्मय , रहस्यकथा वाचू नयेत किंवा वाहिन्यांवरील मारामाऱ्या, खून यांसारखी भीती, दु:ख किंवा क्रोध निर्माण करणारी दृश्ये बघू नयेत. गरोदर स्त्रीला ज्या देवतेचे, संतांचे किंवा वीरपुरुषांचे गुण आपल्या मुलात यावे, असे वाटत असेल, त्याची मूर्ती किंवा छायाचित्र समोर ठेवून त्यावर ध्यान करावे. ध्यानाच्या शेवटी गर्भवती स्त्री काही आवश्यक सूचनाही देऊ शकते. गर्भवती स्त्रीने नामजप करावा. आईचा आहार, विहार, विचार व इच्छा यांचा गर्भावर परिणाम होतो. गर्भवतीच्या उत्तम आचार-विचारांचा गर्भाच्या मनावर ठसा उमटतो.
 

अनुभव 

गरोदरपणी अखंड नामजप केल्याने प्रसुतीच्या वेळी त्रास न होणे व तेजसवरही नामजपाचा संस्कार होणे : तेजस पोटात असतांना गरोदरपणी मला डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितले होते. मी या काळात आमची कुलदेवी श्री कामाक्षीदेवी हिचा अखंड जप करायचे. त्यामुळेच कु. तेजसच्या जन्माच्या वेळीसुद्धा मला कोणताही त्रास झाला नाही आणि ईश्वराच्या अखंड स्मरणाने त्याच्यावर नामाचा संस्कार झाला. याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञ आहे. - सौ. शिरोडकर.
 

नामकरण संस्काराविषयीच्या सूचना

धर्मानुसार मुलांना नावे ठेवावीत : आपल्या मुलांना रीटा इत्यादी ख्रिस्ती पंथीय किंवा इतर पंथात असलेली किंवा पिंटू, बंटी इत्यादी अर्थशून्य नावे ठेवण्या ऐवजी नामकरण विधीच्या शास्त्रात सांगितल्यानुसार नावे ठेवल्यास अधिक लाभ होतो. नावाचा परिणाम मानवाचे मन, व्यवहार आणि जीवनावर होतो. म्हणून हिंदू धर्म शास्त्रात कोणत्या प्रकारची नावे ठेवायची, हे सांगण्यात आले आहे. मूल गर्भाशयात असतानाच त्याचे लिंग निर्धारित होते. त्याच प्रकारे मुलाचे नावही आधीच निर्धारित झालेले असते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पाच घटक कधीही एकत्र असतात. त्यामुळे मुलाच्या रूपानुसार त्याचे नावही असते. ते आम्हाला कळत नाही. पण ते उन्नतांनाच कळते. आम्हाला कोणी उन्नत भेटले नाही तर मुलासाठी योग्य नाव कोणते याविषयी ज्योतिष्यशास्त्रच मार्गदर्शन करू शकते. - कु. गिरीजा 

मुलांना टोपण नावे ठेवल्याने मुलांचा होणारा गोंधळ

मुलीला शाळेत नोंदवलेले नाव अपरिचित वाटणे : एका मुलीचे टोपणनाव नि उपस्थिती पटावरील नाव वेगळे होते. घरी तिला `नमिता' म्हणत होते आणि शाळेत तिचे नाव `स्मिता' नोंदवले होते. उपस्थिती पटावरील नाव तिला समजत नसल्यामुळे ती मुलगी कधीच वर्गात उपस्थिती देऊ शकली नाही. नाव उच्चारल्यावर `ती मी नव्हेच' असाच तिच्या मुखावरील भाव असे. अनेक वेळा पालकांना या गोष्टीची जाणीव देऊनही त्यात बदल होत नव्हता. ती मुलगी मोठ्या वर्गात गेली, तेव्हा तिला आवड-नावड निर्माण झाल्यामुळे उपस्थिती पटावरचे नाव तिला आवडत नसे. वारंवार ही समस्या आल्यामुळे शेवटी तिच्या पालकांना प्रतिज्ञापत्र करून नाव तिचे नाव बदलावे लागले. 

घरी लाडाने पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे नाव घेऊन हाक मारल्याने मुलांचा गोंधळ होणे : काही पालक लाडाने आपल्या पाल्यांची पिंकी, विकी, डॉली, पिंट्या अशी इंग्रजी पद्धतीची टोपणनावे ठेवतात. शाळेत त्या लहान मुलांना त्यांच्या नावाने हाक मारल्यावर त्यांना पटकन कळत नसे आणि ती गोंधळून जात. पालकांना सांगूनही ते त्यात पालट करत नसत. अनेक पालक मुले मोठी झाल्यावरही तशा पद्धतीने हाक मारतात. ती नावे मुलांना उचित वाटत नाहीत, हे त्यांच्या लक्षातही येत नाही.' 

- एक शिक्षिका


प्रतिक्रिया

ashwini shete
January 7, 2015, 4:59 pm

khup chhan vatale
आनंद मंगलदास गोगे
December 11, 2014, 9:22 pm

खुप सुंदर लेख आहे. निश्चितच हा लेख वाचून सर्वाना छान मदत होइल.
mahesh
September 28, 2014, 6:08 am

Khup sundar i am happy
उध्दव चापके
August 16, 2014, 12:24 am

खुप छान
Swapnil Mali
July 27, 2014, 12:22 am

सगळे लोकने याचा अंमल केला पाहिजे. तेव्हा कोठे भारत पुढे जाईल.
prerna milind waykat
May 25, 2014, 2:31 pm

Khup chan aahe aani mala aata yachi gharaj aahe thanx
दिनेश देवरे
May 7, 2014, 12:37 am

खुप छान जिवनात हयाची फार
गरज आहे
Purushottam
April 29, 2014, 2:29 am

Dhanyavad
श्री. विलास अशोक महाले
November 29, 2013, 4:17 pm

आज समाजाच्या बदलत्या जीवनप्रवाहात या शिक्षणाची व या गोष्टींची खरच गरज आहे, जेणेकरुन एक सुसंस्कारीत समाज निर्माण होईल.
सुप्रिया कदम.
February 16, 2013, 7:25 pm

या पिढीला हि खरच या माहितीची गरज आहे.
भारती नितीन thombare
November 6, 2012, 1:21 am

खरच खूप छान सूचना केल्या आहेत या मध्ये......
माधुरी
July 23, 2012, 3:00 pm

खूप छान माहिती आहे मला खूप आवडली जी माहिती आजच्या पिढीला उपयोगी पडेल आणि त्यानुसार प्रत्येक पालक आपल्या मुलावर चांगले संस्कार करू शकतील
प्रसाद गोलीपकार
April 1, 2012, 8:41 pm

खर्च खूप सुंदर माहिती आहे ही . धन्यवाद !
vandana
November 5, 2011, 1:36 am

namaskar tai.
ajcha dhakadhakichya kalat tumhi khup changala kam karun saglyana
ek vyaspith tayar karun dile
dhanyavd
धनश्री खुरूद
October 29, 2011, 12:53 am

खूपच मनाला भावणाऱ्या गोष्टी आहेत, खूप छान वाटले वाचून, धन्यवाद.
Seema Sukesh Raut
October 19, 2011, 5:34 pm

छान वाटले. मनपूर्वक आभार.
prajakta
October 16, 2011, 8:03 pm

आजकालच्या घाईच्या युगात इतकी महत्वाची माहिती द्यायला कोणालाच वेळ नाही तुमचे फार फार फार धन्यवाद.
सचिन patil
September 26, 2011, 2:48 am

फार छान माहिती दिलेली आहे. धन्यवाद.बरीच माहिती जी आजच्या पीडिला माहित नाही, ती सर्व इथे उप्लाभ्ध आहे.
Thank you
वैशाली धावले
July 6, 2011, 12:16 am

फार छान उपयुक्त अशी माहिती !
नवनाथ
June 28, 2011, 6:55 pm

वेरी गुड हे वेब्सिते
योगेंद्र दीक्षित
April 27, 2011, 11:10 pm

बालक हे राष्ट्राचे भावी निर्माते असल्याने त्यांचे राष्ट्राभिमुख प्रबोधन अति आवश्यक आहे आणि त्यासाठी आपले संकेतस्थळ खूप उत्क्रिष्ट पणे सर्व तत्त्व मांडत आहे. आपण बालक, पालक, शिक्षक आणि सात्विक समाज घडवण्याचे जे कार्य करीत आहात त्याची आजच्या काळात खूप गरज आहे.
संतोष Patil
March 25, 2011, 11:35 pm

फार छान माहिती दिलेली आहे. धन्यवाद|.
प्रवीण patil
December 30, 2010, 3:30 am

चांगली माहिती दिल्या बद्दल सुबेचाया
हरीश gaikar
December 30, 2010, 3:28 am

गुड saggesion
karuna
December 9, 2010, 2:42 pm

hi site khup sundar aahe mala khup aavadali yat garbh sanskar jara deatail aste tar bar zal ast
खूप सुंदर साईट आहे. यामुळे सर्वाना माहिती मिळण्यास मदत होते
October 29, 2010, 4:13 pm

बरीच माहिती जी आजच्या पीडिला माहित नाही, ती सर्व इथे उप्लाभ्ध आहे. ती सर्वन पर्यंत पोहोचो हीच अपेक्षा.
शिवाजी पवार
September 17, 2010, 9:18 pm

अतिशय सुंदर वेब साईट !!! तुमच्या सगळ्या team चे अभिनंदन. पालक आणि मुलांना खूप उपयोगी असे संस्कार अंड गोष्टी शिकायला मिळतील.
शिवाजी पवार
September 17, 2010, 9:15 pm

मराठी संस्कृतीची जपणूक करण्यासाठी लेख पाठवावेत
marathi sansakrutichi mulyai japayala havit
September 17, 2010, 9:10 pm

Thank you
sanjayumate
September 8, 2010, 4:52 pm

बरीच माहिती जी आजच्या पीडिला माहित नाही, ती सर्व इथे उप्लाभ्ध आहे. ती सर्वन पर्यंत पोहोचो हीच अपेक्षा.
पराग कुलकर्णी
June 24, 2010, 1:16 pm

खूप सुंदर साईट आहे. सर्वांसाठी बोधकारक आहे. माझ्याकडे जी काही माहिती असेल ती मला द्यायला आवडेल. ती माहिती कुठे आणि कशी पाठवू ते कृपया सांगितले तर मला आनंदच होईल.
राहुल vinchurkar
June 1, 2010, 2:00 pm

खरे आहे. आपण आपली मुलांची नावे आपल्या या जगातील सर्वश्रेष्ठ असलेल्या हिंदू धर्मातील महान, कर्तबगार व्यक्तींच्या नावावरूनच ठेवायला हवीत.
राहुल विंचूरकर.
श्रीकृष्ण बंगला, इंदिरा नगर, नाशिक.
niranjana
April 2, 2010, 2:47 pm

khup sundar ani arthpurna
प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)


* शहर*Image Validation (?)


*प्रतिक्रिया

लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त

Vadhdivas
Participate
  Bal Sanskar© २०१५  बालसंस्कार.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत.  
Terms of use l Privacy policy l Spiritual Terminology