Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध

मकरसंक्रांत


मूल्यांकन : Average Rating : 6.04 From 73 Voter(s) | वाचक संख्या : 10637
By Bal Sanskar


 

संक्रांतीचे महत्त्व 

        या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते. या काळात रज-सत्त्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असल्यामुळे हा काळ साधना करणार्‍यांना पोषक असतो.
 

संक्रांतीला तिळाचा वापर करण्याचे महत्त्व 

        तिळात सत्त्वलहरी ग्रहण व प्रक्षेपित करण्याची क्षमता जास्त असल्यामुळे तिळाच्या वापराने शरीरातील सत्त्वगुणात वाढ होते व साधना चांगली होण्यास मदत होते.
 

संक्रांतीला स्त्रियांनी हळदीकुंकू करण्याचे महत्त्व 

        हळदीकुंकू करणे, म्हणजे एकप्रकारे ब्रह्मांडातील सुप्‍त आदिशक्‍तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय. यातून जिवावर सगुण भक्‍तीचा संस्कार होण्यास, तसेच ईश्‍वराप्रती जिवाचा भाव वाढण्यास मदत होते. हळदीकुंकवातील पंचोपचार :

१. हळद-कुंकू लावणे : हळद-कुंकू लावल्यामुळे सुवासिनीमधील श्री दुर्गादेवीचे सुप्‍त तत्त्व जागृत होऊन हळद-कुंकू लावणार्‍या जिवाचे कल्याण करते.

२. अत्तर लावणे : अत्तरातून प्रक्षेपित होणार्‍या गंधकणांमुळे देवतेचे तत्त्व प्रसन्न होऊन जिवासाठी कमी कालावधीत कार्य करते (जिवाचे कल्याण करते).

३. गुलाबपाणी शिंपडणे : गुलाबपाण्यातून प्रक्षेपित होणार्‍या सुगंधित लहरींमुळे देवतेच्या लहरी कार्यरत होऊन वातावरणाची शुद्धी होते व जिवाला कार्यरत देवतेच्या सगुण तत्त्वाचा अधिक फायदा मिळतो.

४. वाण देणे : वाण देतांना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण देणे म्हणजे दुसर्‍या जिवातील देवत्वाला तन, मन व धन यांच्या त्यागातून शरण येणे. पदराच्या टोकाचा आधार देणे, म्हणजे अंगावरील वस्त्राच्या आसक्‍तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे. संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जिवाला इच्छित फलप्राप्‍ती होते.

५. ओटी भरणे : ओटी भरणे, म्हणजे श्री दुर्गादेवीच्या ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या इच्छाशक्‍तीला आवाहन करून श्री दुर्गादेवीची निर्मितीची किंवा कार्य करण्याची इच्छा प्रबळ करणे होय. देवतेच्या कार्यरत इच्छाशक्‍तीतूनच देवतेची कृपा लवकर संपादन करता येते. देवतेच्या इच्छाशक्‍तीतूनच जिवाला साधना करण्याची स्फूर्ती मिळते. साधनेतील पुढच्या टप्प्यात जिवाला देवतेच्या कार्यरत क्रियाशक्‍तीतून साधना म्हणून प्रत्येक कर्म करण्याची शक्‍ती प्राप्‍त होते व त्यानंतर कार्यरत ज्ञानशक्‍तीतून जिवाला वैराग्य प्राप्‍त होते.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ' सण,धार्मिक उत्सव व व्रते ' 

         शिशुसंस्कार म्हणून बाळाला बोरन्हाण घातलं जातं. बदलत्या ऋतूमानाशी जुळवून घेत शारीरिक आरोग्य राखायचा व्यापक विचार यामागे आहे. बोरन्हाण घालण्यामागील शास्त्रीय महत्त्व सांगणारी ध्वनिचित्रफीत पाहूया.

 




संबंधित लेख

» दसरा (दशहरा)
» दिवाळी (दीपावली)
» दत्त जयंती
» महाशिवरात्री
» सरस्वती-पूजन
» तुळशी विवाह
» रथसप्‍तमी
» वसंत पंचमी


प्रतिक्रिया

अंकुश तरवाडे
January 20, 2012, 8:12 pm

छान
DILIP D PATIL
January 20, 2012, 1:14 pm

mahiti uttam ahe
Amrut बाबर
January 17, 2012, 9:52 pm

मला या site मुळे आपल्या सणाचे महत्त्व माहीत होते. मी आपला ऋणी आहे.
राजेंद्र महाडिक
January 16, 2012, 9:35 pm

मला या site वरील माहिती खूप आवडते.
धन्यवाद,
राजेश
January 15, 2012, 5:00 pm

माहितीसाठी खूप खूप धन्यवाद.
अनिल चौगुले
January 14, 2012, 11:10 pm

खूप छान.
Aparna
January 14, 2012, 3:08 am

खूप छान माहिती पूर्ण असा लेख आहे
सालबा
January 13, 2012, 10:59 pm

बेस्ट
Pradeep
January 13, 2012, 9:22 pm

very good
ANUKUL
January 13, 2012, 12:58 am

nice
सई अमरे
January 12, 2012, 7:38 pm

खूप छान माहिती होती. नेमके कसे करायचे ते काळात नाही. शास्त्र समजले कि चांगले वाटते. धन्यवाद !
प्रकाश कृष्णाजी SHETYE
January 12, 2012, 3:11 pm

माहिती खूपच आवडली & माहितीपूर्ण वाटली थान्क्स
Rajendra
January 10, 2012, 3:08 pm

mala poush mahinya vishai mahiti havi aahe. ya mahinyat vivaha baddal bolani ka karit nahit ? he janun ghyavayache aahe.
SUDAM
January 30, 2011, 5:31 am

महत्वपूर्ण माहीती
प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)


* गाव नगरी




*Image Validation (?)


*प्रतिक्रिया





लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group