माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्र. या दिवशी सर्व शिवभक्त शंकराची, म्हणजे शिवाची पूजा करतात. या निमित्ताने आपण शिवाविषयी काही माहिती करून घेऊया. आपल्या संस्कृतीत विविध देवता, त्यांच्या उपासना सांगितल्या आहेत. हवेत ऑक्सिजन, नायट्रोजन इत्यादि मूलभूत तत्त्वे आहेत, तसेच ३३ कोटी देवता या तत्त्व रूपाने आहेत. त्यांतील प्रत्येकाचे कार्य निराळे आहे. प्रत्येक देवतेची उपासना करून आपल्याला त्या त्या देवतेशी एकरूप होता येते. महाशिवरात्रीदिवशी शिवाचे तत्त्व वातावरणात मोठ्या प्रमाणात येत असते. त्यामुळे त्या दिवशी शिवाची उपासना केल्यास त्याचा जास्तीतजास्त फायदा होतो.
`महाशिवरात्री' म्हणजे काय ?
पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री' असे म्हणतात.
महाशिवरात्रीचे व्रत का करावे ?
शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे.
व्रत आचरण्याची पद्धत व विधी
उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा' असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहातात. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन व्रतसमाप्ती करावी.
शिवपूजेची वैशिष्ट्ये
१. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.
२. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात.
३. शिवपूजेत पांढर्या अक्षता वापरतात.
४. शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात.
५. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.
October 15, 2012, 6:30 pm
kuhp chan aahe .yatun khup kahi shikanyasarkhe aahe .lahan mulansobat mothynya far upyogi website aahe .mi tumchi khup aabhari aahe.