Select Language : हिंदी , English ,  ಕನ್ನಡ  

आंतरिक शोध

Subscribe To Newsletter

Enter your email address:


Delivered by FeedBurner
Kindly note verification mail goes to SPAM, so please check your SPAM folder

आरती,संग्रह,Arati,Mi,Marathi,Manus,hindi,आरती संग्रह,गणेश महिमा, गणेश पूजन, मोदक, अष्टविनायक, अष्टगणेश, गावचा गणपती, सिध्दिविनायक, श्रीगणेशा, श्री गणेशाय नम, लंबोदर, श्रीगणेशाचे, श्रीगणेश,,Ganesh, Ganapati, Shri Ganesh, Ganesh Festival, Ganesh Mahima, Ganesh Pujan,--><!--@@CommonKeywords@@--><!--


श्रीरामरक्षास्तोत्र
आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)

सूट १० %

खरेदीसाठी भेट द्या !


महाराणा प्रताप


मूल्यांकन : Average Rating : 4.95 From 155 Voter(s) | वाचक संख्या : 21544
By Bal Sanskar


        बालमित्रांनो, भारताच्या इतिहासात शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच महाराणा प्रताप यांचेही नाव अजरामर झाले आहे. राणा प्रताप हे राजस्थानमधील एक शूर आणि स्वाभिमानी राजे होते.

        जयपूरचा राणा मानसिंग याने अकबरापासून आपल्या राज्याला धोका पोहोचू नये; म्हणून आपली बहीण देऊन त्याच्याशी सोयरीक केली होती. एकदा तो राजपुतान्यातून दिल्लीस जात असता वाटेत जाणूनबुजून आपल्या वैभवाचे प्रदर्शन करण्याकरता कुंभलगडावर असलेल्या राणा प्रताप यांच्या भेटीस गेला. राणा प्रताप यांनी त्याचा यथायोग्य आदरसत्कार केला; पण त्याच्या पंक्तीत बसून जेवण्यास नकार दिला. मानसिंगाने याचे कारण विचारता राणा प्रताप म्हणाले, ``स्वत:च्या समशेरीच्या बळावर आपल्या राज्याचे रक्षण करण्याकरिता जे रजपूत आपल्या मुली-बहिणी मोगलांना देऊन त्यांच्यापासून राज्याचे रक्षण करतात, अशा स्वाभिमानशून्य रजपुतांच्या पंक्तीला मी बसत नाही.''

        राणाजींच्या या घणाघाती वक्तव्याने डिवचला गेलेला मानसिंग वाढलेल्या पानावरून तसाच उठला आणि तेथून जाता जाता म्हणाला, ``प्रतापसिंह! रणांगणात तुझी मी वाट नाही लावली, तर नावाचा मानसिंग नाही !''

स्वामिनिष्ठ चेतक
स्वामिनिष्ठ चेतक

        मानसिंग प्रचंड सैन्य आणि भरीला अकबराचा मुलगा सलीम यालाही घेऊन राणा प्रताप यांच्या पारिपत्याच्या मोहिमेवर निघाला. राणाजींना ही वार्ता लागताच त्यांनी अरवली पर्वतावरील वाटेने जाणाऱ्या मानसिंगाच्या सैन्यावर छुपे आक्रमण करून त्याचे बरेच सैनिक गारद केले. राणा प्रताप यांच्या तलवारीच्या घावाने शहाजादा सलीम ठार होणार होता; पण वेळीच त्याने हालचाल केल्यामुळे तो वार त्याच्या हत्तीवर बसला. मानसिंग तर राणा प्रताप यांच्या तलवारीच्या धाकाने स्वत:च्या सैन्याच्या पिछाडीला राहिला. राणाजी आपल्या तळपत्या तलवारीने वेढा कापून निसटून जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात कुणा शत्रूसैनिकाने राणाजींचा घोडा चेतक याच्या एका पायावर तीर सोडून त्याचा पाय निकामी केला. तशाही स्थितीत तो स्वामिनिष्ठ घोडा चौखूर दौडत पाठीवरच्या धन्याला घेऊन त्या वेढ्याचा भेद करून दूर दूर जाऊ लागला. तेवढ्यात वाटेत एक ओढा लागला. चेतकने उडी घेऊन तो ओढा पार केला आणि ऊर फुटेपर्यंत धावल्यामुळे त्याने त्याच क्षणी प्राण सोडला.

        आपला पाठलाग कोण करत आहे, हे पहाण्यासाठी राणा प्रताप यांनी मागे नजर टाकली, तर अकबराला जाऊन मिळालेला आपला धाकटा भाऊ शक्तीसिंह हा त्याच्या समवेत आलेल्या चार-पाच मोगल सैनिकांना जिवे मारत होता. राणाजी ते दृश्य पाहून अचंबित झाले. तेवढ्यात त्या पाचही शिपायांचे प्राण घेऊन शक्तीसिंह राणाजींजवळ आला आणि त्यांना आलिंगन देऊन म्हणाला, ``दादा ! तुझ्यासारखे असीम शौर्य आणि कणखर मन यांच्या अभावी मी जरी मोगलांची सरदारकी करत असलो, तरी तूच माझा आदर्श आहेस. तुझ्यापुढेच काय; पण तुझ्या त्या निष्ठावंत घोड्यापुढेही मी तुच्छ आहे.''

        मेवाडचा इतिहास लिहिणारा कर्नल टॉण्ड याने राणा प्रताप यांचा गौरव करतांना म्हटले आहे, `प्रबळ महत्त्वाकांक्षा, शासन निपुणता आणि अपरिमित साधनसंपत्ती यांच्या जोरावर अकबराने दृढनिश्चयी, धैर्यशाली, उज्ज्वल कीर्तीमान आणि साहसी अशा प्रतापला नमवण्याचा प्रयत्न केला; पण तो निष्फळ ठरला.'

        बालमित्रांनो, तुम्ही आता शूर आणि स्वाभिमानी राजा राणा प्रतापची गोष्ट वाचलीत. आपण जर सर्व प्राणीमात्रांवर प्रेम केले, तर पशूही आपल्याला जीव लावतात. हे तुम्हाला चेतक या घोड्याच्या उदाहरणावरून कळले असेल. स्वामिनिष्ठ घोड्याने आपल्या जिवाची बाजी लावून राजाला वाचवले. राणा प्रतापचा भाऊ शक्तीसिंह यानेही निष्ठावंत घोड्यापुढेही तुच्छ असल्याचे सांगितले. आपणही सर्वांवर प्रेम करायला शिकले पाहिजे.


प्रतिक्रिया

अक्षय ( राणा ) पवार
March 25, 2015, 9:37 pm

जय राजपुताना
जय महाराणा
जय राजपूत

मला वाटत कि महाराणा प्रतापांचा इतिहास पाठ्यपुस्तकात आला पाहिजे

राणा सोमनाथ Narayan Sitapure
May 16, 2014, 9:24 pm

maharana pratap yanchevaril changale lekh vachlyanantar angat sfuran yete.ur bharuan yeto. angat vegalya prakarche chaitanya jage hote. Thor mothani ase lekh jarur vachavet.
नरेंद्र THAKARE
April 23, 2014, 7:43 pm

महाराणा प्रताप हे शूर होते त्याचा मला अभिमान ahe
दिपक रामचंद्र चिरडे हिंदू Pusad
April 2, 2014, 5:53 pm

लेख वाचून आता वाटते कि महाराणा जसे शूर होते, तसे आपणही व्हावे. खूप चांगली माहिती मिळाले आहे.
लता रणधीरसिंह होलिये
February 11, 2014, 7:59 pm

मला मी राजपूत असल्याचा सार्थ अभिमान आहे महाराणा प्रताप यांचा आदर्श समोर ठेवून समाजासाठी आणि समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करेन. महाराजांचे विचार रुजवण्याचा प्रयत्न करेन . जय ranaji
RANA RAVINDRASING SHIVSING RAJPUT
January 23, 2014, 1:24 pm

I AM PROUD TO BE A RAjPUT
shivaji dawkhar
December 12, 2013, 8:49 pm

हमारे हिंदू तथा शूरवीर महाराणा प्रताप इनको शतशः प्रणाम

द्वारा
शिवाजीराव डावखर
पिंपरी चिंचवड ,
पुना
maharastra
संदीप लबडे
September 10, 2013, 9:00 pm

छान
तन्मय पंकज चौधरी
August 7, 2013, 8:53 pm

महाराणा प्रताप यांना माझा कोटी कोटी प्रणाम.
सुनील भरतसिंग रावल
June 17, 2013, 7:21 pm

वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना कोटी कोटी प्रणाम आणि त्यांचा घोडा चेतक विनंम्र अभिवादन .
द ग्रेट राणा महाराणा प्रताप कि जय हो
प्राची
June 17, 2013, 2:39 pm

महाराणा प्रतापना प्रणाम .
ते एक महान राजे होते .
त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सर्व शत्रूंना पाणी पाजले
Ganesh Ambokar
June 12, 2013, 12:26 pm

really great........but we will be happy if we get some more knowledge abt it.
rakesh
June 11, 2013, 12:05 pm

मी राजपूत असल्याचा मला गर्व आहे
राकेश जयसिंग गिरासे
June 10, 2013, 4:38 pm

द ग्रेट राणा महाराणा प्रताप कि जय हो !!
हिंदुकुल वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या ४७३ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

राकेश गिरासे
अमलथे नंदुरबार
Narendrasingh g.Rajput
May 6, 2013, 11:52 am

Very great Rana
Avinash
November 22, 2012, 6:14 pm

खर तर अशा शूर भारतीय राजांच्या कथा ऐकल्यावर मन एकदम भरून येते..... आणि अभिमान वाटतो..
NITIN SHIROLE
September 13, 2012, 6:37 pm

मला खूप अभिमान आहे.
प्रवीण pande
July 5, 2012, 7:37 pm

मला गर्व आहे कि मी पण महाराणा प्रताप चा वशंज आहो,राजस्तानी आहो,एक मेवाडी aaho
योगेंद्रसिंग डी. सिसोदिया
June 17, 2012, 3:36 pm

राष्ट्रगौरव महाराणा प्रताप कि जय हो !!!!

- योगेंद्रसिंग सिसोदिया
अध्यक्ष - तंटामुक्त गाव समिती
बोरगाव, त. शिरपूर
मो. ९८५०२७९२२२
sudhir
May 4, 2012, 7:43 pm

मस्त आहे हि वेब साईट धन्य वाद इतिहास जपल्या बद्दल.
प्रवीण gawali
February 22, 2012, 2:25 pm

महाराणा शूर होते.
नवनाथ
April 14, 2011, 2:04 pm

हे वेब्सिते अतिशांय चाअंगली आहे
गोरक्षनाथ वर्पे
February 7, 2011, 1:53 am

पूर्ण website छान आहे.
mohit
October 30, 2010, 4:52 am

really great........but we will be happy if we get some more knowledge abt it..
प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)


* शहर*Image Validation (?)


*प्रतिक्रिया

लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त

Vadhdivas
Participate
  Bal Sanskar© २०१५  बालसंस्कार.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत.  
Terms of use l Privacy policy l Spiritual Terminology