Select Language : हिंदी , English ,  ಕನ್ನಡ  

आंतरिक शोध

Subscribe To Newsletter

Enter your email address:


Delivered by FeedBurner
Kindly note verification mail goes to SPAM, so please check your SPAM folder

आरती,संग्रह,Arati,Mi,Marathi,Manus,hindi,आरती संग्रह,गणेश महिमा, गणेश पूजन, मोदक, अष्टविनायक, अष्टगणेश, गावचा गणपती, सिध्दिविनायक, श्रीगणेशा, श्री गणेशाय नम, लंबोदर, श्रीगणेशाचे, श्रीगणेश,,Ganesh, Ganapati, Shri Ganesh, Ganesh Festival, Ganesh Mahima, Ganesh Pujan,--><!--@@CommonKeywords@@--><!--


श्रीरामरक्षास्तोत्र
आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)

सूट १० %

खरेदीसाठी भेट द्या !


छत्रपती शिवाजी महाराज आणि रायरेश्र्वर गड


मूल्यांकन : Average Rating : 5.36 From 88 Voter(s) | वाचक संख्या : 15413
By Bal Sanskar

        वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. हिंदवी स्वराज्यासाठी मूठभर मावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले. पाच मुसलमानी पातशाहींच्या विरोधात लढत एक एक प्रदेश जिंकला. केवळ ५० वर्षांच्या कालावधीत विजापूर आणि दिल्ली या राजसत्तांना पाणी पाजले. खिस्ताब्द १६७४ मध्ये त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि हिंदु धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले.

         छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाग्यविधाते म्हणून स्वराज्याची जनता त्यांना पाहू लागली. काही जण, तर त्यांना हिंदूपती पातशहा म्हणू लागले. शिवरायांनी वेदांचे, पुराणांचे, देवळांचे रक्षण केले आणि जीभेवर रामनाम राखून धरले. सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली.
 
 
हिंदवी स्वराज्याचा साक्षीदार

रायरेश्वरसह्याद्रीच्या कडेकपारी, शिवमंदिर एक ।
तिथे रायरेश्वर स्वयंभू शिवलिंग सुरेख ।।
आणाभाका झाल्या आमुच्या, त्याच्या साक्षीने ।
एकजुटीने राहून कोणा अंतर न देणे ।।
देशासाठी, धर्मासाठी झोकून देऊ उडी ।
मावळे आम्ही शिवबाचे सवंगडी ।।

         सृष्टीच्या नानाविध रूपांचे प्रत्यंतर देणारा निसर्गरम्य रायरेश्वरगड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. तो समुद्रसपाटीपासून ४६९४ फूट उंचावर वसला आहे. येथून वैराटागड, केंजळगड, पांडवगड, कमळगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोळेश्वर, रायगड, लिंगाणा, तिकोणा, राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, प्रतापगड, चंद्रगड इ. गड दिसतात. रायरेश्वर पठाराची लांबी ११.०४ कि.मी. असून, रुंदी १.०२ कि.मी. आहे. गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेले शिवमंदिर आणि जननी देवीचे मंदिर आहे. छ. शिवाजी महाराजांनी शिवा जंगम नावाचा पुजारी तेथे पूजेसाठी नेमला होता. सध्या येथे जंगम लोकांची ४० कुटुंबे रहातात.

          सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात छ. शिवाजी महाराजांनी २६ एप्रिल १६४५ या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती. सिंहाची छाती असणार्‍या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची आण घेतली.

रायरेश्र्वर गडाविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध !


प्रतिक्रिया

Namdev kale
March 13, 2015, 3:59 am

खूप छान. मला खूप आवडली.
धम्मपाल वि. गवारगुर
August 28, 2014, 10:57 am

राजाच्या विचारांची आज देशाला खुप गरज आहे
अंकुश पवार
March 14, 2014, 9:12 pm

जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
snehal kamble
September 18, 2013, 9:00 pm

Chhan
वैभव रवींद्र bagade
April 23, 2013, 1:49 am

शिवाजी महाराज कि जय. जय भवानी , जय शिवाजी. शिवाजी महाराज हे प्रचंड शक्तिशाली असे महान योद्धे होते. त्यांनी खूप गड आणि किल्ले जिंकले आणि भगवा झ्हेंडा फडकवला.
भास्कर
January 16, 2013, 4:51 pm

शिवाजी महाराज हे मर्द मराठा महा पुरुष होते, त्यांची आटवन आल्यावर माझ्या नसानसातून रोम उभे राहतात, अशा महा पुरुषाला माझा मानाचा मुजरा.
Shri Vijay Ramchandra Maske
November 15, 2012, 3:31 pm

खूपचं छान आणि सर्वांनी वाचण्या सारखे आहे.
विनोद
October 28, 2012, 9:28 pm

जय भवानी जय शिवाजी
सागर पाटील
October 22, 2012, 6:23 pm

खूप चं छान आणि सर्वांनी वाचण्या सारखे आहे
जय भवानी जय शिवाजी ,
सागर पाटील
जयेश महेश सावंत
September 8, 2012, 12:49 am

खूप चं छान आणि सर्वांनी वाचण्या सारखे आहे..... निचित वाचा .......
sanat
August 27, 2012, 10:19 pm

सर्वात चांगली गोष्ट @ !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
लक्ष्मन कचरे
August 22, 2012, 7:26 pm

खूप छान वाचताना अंगावर काटे यावेत.... जय भवानी जय शिवाजी
SANTOSH
July 20, 2012, 6:42 pm

शिवाजी महाराज हे महा पुरुष होते, त्यांची आटवन आल्यावर माझ्या नसानसातून रोम उभे राहतात, अशा महा पुरुषाला माझा मानाचा मुजरा.

संतोष सावंत (भोसले)

संग्राम बाबुराव चौगले
March 3, 2012, 12:31 pm

छत्रपती शिवाजी राजांचे आणखी लेख यावर पोस्त केले पाहिजेत.
सुजित
February 5, 2012, 3:29 pm

छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराय्जाचे मर्द मराठा शूरवीर होते .मला शिवाजी राजांचा अभिमान आहे . मी मराठी.
.
रवी
February 4, 2012, 2:18 am

जय भवानी जय शिवाजी , फार सुंदर वेरी वेरी वेरी वेरी गुड
janhavi Patil
January 28, 2012, 1:59 am

खूप चांगला ......
शीतल प्रशांत गीध
July 25, 2011, 8:00 pm

फार सुंदर !!!!!!
प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)


* शहर*Image Validation (?)


*प्रतिक्रिया

लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त

Vadhdivas
Participate
  Bal Sanskar© २०१५  बालसंस्कार.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत.  
Terms of use l Privacy policy l Spiritual Terminology