Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध

लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे !


मूल्यांकन : Average Rating : 6.63 From 19 Voter(s) | वाचक संख्या : 7196
By Bal Sanskar

        ‘धर्मशास्त्रात सांगितले आहे की, प्रत्येकाने सकाळी लवकर म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी उठायला हवे; परंतु आजकाल मुलांना अभ्यास किंवा अन्य कारणास्तव रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याची आणि सकाळी ८-९ वाजता उठण्याची अयोग्य सवय लागली आहे. जागरण करणे, हे आरोग्यदृष्ट्या हानीकारक आहे. याउलट ‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे’, असे म्हटले आहे. याचा अर्थ जो लवकर झोपून लवकर उठतो, त्याला दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य मिळून तो धनवान होतो.
 

सकाळी उशिरा उठल्यामुळे होणारी हानी 

‘जो सकाळी उशिरा उठतो त्याला नरकाची प्राप्ती होते’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. तसेच -  

अ. उशिरा उठल्याने शरिरात आळस वाढतो.

आ. उशिरा उठणारी मुले अनेकदा काळजीत आणि निराश असतात; कारण सकाळी वेळेत न उठल्याने त्यांचे वैयक्तिक आवरणे, तसेच गृहपाठ वेळेत पूर्ण होत नाही.
 

सकाळी लवकर उठण्याचे लाभ 

         पूर्वीच्या काळी ऋषी-मुनी ब्राह्ममुहूर्तावर उठून वेदपठण करत. रात्री वातावरणात रज-तम गुणांचे, म्हणजे त्रासदायक वाटण्याचे प्रमाण अधिक असते, तर पहाटे वातावरण सात्त्विक, म्हणजे आनंददायक असते. सकाळचे वातावरणही शुद्ध आणि पवित्र, तसेच शांत आणि थंड असते. या काळात केलेला नामजप भावपूर्ण होतो, तसेच अभ्यासही चांगला होतो.

            नियमितपणे सकाळी लवकर उठणारी मुले आनंदी असतात. मुलांनो, सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय लावून घ्या, तसेच भावंडांनाही सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, 'सुसंस्कार आणि चांगल्या सवयी'

 




संबंधित लेख

» मुलांनो, 'लवकर निजा व लवकर उठा' !
» मुलांनो, सदगुणांच्या साहाय्याने शिक्षणपद्धतीतील दुष्परिणामांवर मात करून गुणसंपन्न होऊया !
» विद्यार्थ्यानो, शिक्षकदिन गुरुपौर्णिमेला साजरा करा !
» विद्यार्थ्यांनो, परीक्षेच्या वेळी
विविध आध्यात्मिक उपाय करा !



प्रतिक्रिया

अभिजित नाईक
January 17, 2012, 9:04 pm

सर मला सकाळी उठण्याची सवय नाही आहे आणि ज्या मुले माझं खूप मोठ नुकसान होतंय, माझी रात्री झोपण्याची वेळ पक्की नाही .... कारण मी व्यवसायात आहे. जर आपण यावर काही उपाय देऊ शकत असाल तर कृपया द्यावे ....... मी आपल्या प्रतिक्रियेची वाट बघेन आपला कृपाभिलाशी ...........

माझं इमेल आयडी वरती दिला आहे धन्यवाद
Arun Shinde
October 15, 2011, 1:06 pm

मुलासाठी खूपच छान माहिती आहे माझ्या मुलीला उशिरा उठायची सवय आहे तिच्या साठी आपला लेख महत्वाचा वाटला

कळावे
एक पालक
अरुण शिंदे
pallavi
October 4, 2011, 6:49 pm

very good website.
प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)


* गाव नगरी




*Image Validation (?)


*प्रतिक्रिया





लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group