Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध

मुलांनी चित्रकथा (कॉमिक्स) वाचण्यापेक्षा पुराणातील कथा वाचण्याने त्यांचा सर्वंकष विकास होईल !


मूल्यांकन : Average Rating : 6.38 From 8 Voter(s) | वाचक संख्या : 2838
By Bal Sanskar


 

        ‘मुले कुठेही, केव्हाही, कुणाही बरोबर असू देत, त्यांना चित्रकथांचीच धुंद असते. चित्रकथा (कॉमिक्स) मुलांचा मानसिक, वैचारिक आणि चारित्र्यगत अधःपात करतात. चित्रकथा मुलांचे मन, बुद्धी आणि सगळे व्यक्तित्वच अपंग, एकाकी, संवेदनाहीन, रुक्ष बनवतात. त्या मुलांची धारणा `जीवनात कोणतीही समस्या, अडचण येताच पॅन्टम वा सुपरमॅन पापणी लवताच दूर करील’, अशी होते. त्यामुळे ते वास्तवापासून दूर जातात आणि त्यांचे पाय भूमीवर ठरत नाहीत. धैर्य, साहस असलेला तो काल्पनिक शक्तीशाली मुलांचा आदर्श होतो. वास्तवात तो नसतो, हे सत्य मुले स्वीकारूच शकत नाहीत. याचबरोबर चित्रकथांची भाषा अश्लील, भोंगळ आणि व्याकरणदृष्ट्याही शुद्ध नसते. चित्रकथांमध्ये वाक्यांचे प्रमाण अल्प आणि चित्रांचे प्रमाण अधिक असते. चित्रांवरूनच मुले कल्पना करतात. त्यांच्यामध्ये स्वतंत्रपणे कल्पना करणे वा चिंतन करण्याची क्षमताच नसते. त्यांची दृष्टीद्वारा ग्रहणक्षमता क्षीण होत जाते.

        आपण मुलांना पुराणातल्या कथा का नाही देत वाचायला ? त्यामुळे त्यांचे ज्ञान वाढेलच, त्याचबरोबर त्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासही होईल. मुलांत साहस, धैर्य येईल. त्यांच्यात कुतुहलता आणि जिज्ञासा वाढेल. त्यांचे मन सागरासारखे विशाल होईल.

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जून २००९)




संबंधित लेख

» हनुमान जयंती
» विठ्ठल : महाराष्ट्राचे आराध्य दैवत
» पंढरपूरात पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना
» पंढपूरची वारी


प्रतिक्रिया

प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)


* गाव नगरी




*Image Validation (?)


*प्रतिक्रिया





लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate

 
Google Groups
Subscribe to Baalsanskar
Email:
Visit this group